जेवण बनवण्याचा वाद पतीच्या जीवावर बेतला, पत्नीचं धक्कादायक कृत्य.. सांगली हादरली

Wife Killed Husband In Sangali: क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून पत्नीने पतीला कायमचे संपवल्याची घटना सांगलीतील मिरज तालुक्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: May 25, 2023, 02:14 PM IST
जेवण बनवण्याचा वाद पतीच्या जीवावर बेतला, पत्नीचं धक्कादायक कृत्य.. सांगली हादरली title=
sangali wife killed husband in household dispute

Wife Killed Husband: नवरा-बायकोमधील (Husband- Wife News) वाद विकोपाला गेला अन् त्यातून सांगलीत (Sangali) एक थरारक घटना घडल आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून पत्नीने पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Sangali Murder News)

कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या पतीवर हल्ला करत हत्या केली. त्यानंतर महिला घटनास्थळावरुन फरार झाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. 

पती-पत्नींमध्ये वाद

सुभेदार आनंदराव काळे (वय ४५) असं मयत पतीचे नाव आहे. तर, चांदणी काळे असं आरोपी पत्नीचे नाव असून दोघेही मिरज येथील पारधी वस्तीत राहतात. जेवणासाठी स्वयंपाक करत असताना दोघा पती-पत्नींमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांमधील वाद वाढत गेले असता सुभेदार यांनी चांदणीला  शिवगाळ केली तसंच, तिच्या अंगावर धावूनदेखील गेला होता. 

पत्नीचा पतीवर चाकूने हल्ला

सुभेदारने चांदणीला शिवीगाळ केल्यानंतर तिचाही संताप झाला होता. तसंच, तो तिला मारण्यासाठी धावून गेल्यानंतर चांदणीने किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या धारदार वस्तूने त्याच्यावर वार केला. यावेळी बचावासाठी सुभेदारने चांदणीच्या पायावर वार केले. मात्र संतापलेल्या चांदणीने सुभेदारवर सपासप वार केले. त्यातीलच एक वार छातीवर वर्मी लागल्याने सुभेदारचा जागीच मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच चांदणीने घटनास्थळावरुन पळ काढला.

पतीचे करोना काळात निधन, दोन वर्षांनी पत्नीने कबर खोदून काढले अवशेष, कारण... 

पत्नी फरार

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन पंचनामा सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर, पोलिस फरार चांदणीचा शोध घेत आहेत. 

दरम्यान, पोलिसांनी चांदणीविषयी परिसरातील व्यक्तींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी दोघांमध्ये सातत्याने वाद-विवाद होत होते, असे सांगितले. 

मुलाकडून वडिलांचा खून

शेतीची वाटणी आणि पैशासाठी रागाच्या भरात मुलाने स्वतःच्या वडिलांनाच ट्रॅक्टरखाली चिरडून मारल्याची घटना सांगलीत घडली आहे. दादू गणपती आकळे असं मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा लक्ष्मण आकळे याला ताब्यात घेतलं आहे. सकाळी शेतात जात असतानाच मुलगाही तिथे आला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आणि रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घातले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात एकाचदिवशी दोन खूनाच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.