वाळू माफियांकडून तलाठ्याचे अपहरण, ट्रकमधून उडी मारत तलठ्याने वाचवला जीव

वाळू तस्करांवर कारवाई करायला गेलेल्या तलाठ्याचे अपहरण.  

Updated: Jan 30, 2020, 04:25 PM IST
वाळू माफियांकडून तलाठ्याचे अपहरण, ट्रकमधून उडी मारत तलठ्याने वाचवला जीव  title=
संग्रहित छाया

सांगली : वाळू तस्करांवर कारवाई करायला गेलेल्या तलाठ्याचे अपहरण करण्यात आले. तसेच मंडलअधिकाऱ्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रकमधून तलाठी प्रवीण जाधव यांना नेण्यात येत असताना भरधाव ट्रकचे टायर फुटले. त्यामुळे ट्रकचा वेग कमी होताच अपहरण करण्यात आलेल्या तलाठ्यांने जीवाची पर्वा न करता ट्रकमधून उडी मारली आणि आपला जीव वाचवला. दरम्यान, तहसिलदार आणि कर्मचाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग केला.

वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. वाळूची चोरी करत शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवला तसेच नदी पात्रात वाळू उपसा करुन ते धोकादायक केले. अनेक तक्रारी आल्यानंतर तहसिलदाल आणि तलाठी, मंडळअधिकारी कारवाई करण्यातसाठी गेले होते. यावेळी ट्रक चालकाने तलाठ्यांचे अपहरण करत त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत पळवून नेले. दरम्यान, भरधाव ट्रकचे टायर फुटल्याने तलाठ्यांने ट्रकमधून उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले.  तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी ट्रकचा केला पाठलाग केला. मात्र, ट्रक चालक हाती लागला नाही.

मिरज तहसील कार्यालयात तीन ट्रक जप्त तर शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये एक ट्रक जप्त करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्रीची असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरण आणि शासकीय कामात अडथळा आणल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी ही माहिती दिली.