पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर

पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर,  नालासोपारा स्फोटकं प्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीत निष्पन्न.

Updated: Aug 28, 2018, 08:41 PM IST
पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर title=

पुणे : नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समारे आले आहेत. पुण्यातील सन बर्न फेस्टीव्हलही या आरोपींच्या निशाण्यावर असल्याचं चौकशीतून पुढं आल्याचा दावा एटीएसनं केलाय. न्यायालयानं या सर्व आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिलीय. 

आरोपी शरद कळसकर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून कल्याणमधल्या प्रकाश थिएटरमध्ये पद्मावत चित्रपटाच्या खेळादरम्यान बॉम्ब हल्ला 
केल्याचा दावा एटीएसनं केलाय. बेळगावातदेखील पद्मावतच्या खेळादरम्यान हल्ला करण्यात आला होता. सर्व आरोपींकडून १० टीबी डेटा संकलीत करण्यात आल्याची माहिती एटीएसनं न्यायालयात दिलीय. 

आरोपींच्या निशाण्यावर असलेल्या लोकांची  यादीच एसटीएसनं न्यायालयात सादर केली. तपासादरम्यान सांकेतिक भाषेत लिहिलेल्या चिठ्ठया आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपींची एकूण ९ प्रशिक्षण केंद्र असून राज्यात दोन आहेत.