जर्मनीच्या रस्त्यांवर 'परभणी'चे ड्रायव्हर; ST महामंडळाकडून थेट इंटनॅशनल नोकरीची ऑफर

ड्रायव्हर भरतीची... पण ही भरती होणाराय थेट जर्मनीमध्ये... तुम्हालाही जर्मनीत जाऊन ड्रायव्हर बनायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी.   

वनिता कांबळे | Updated: Aug 14, 2024, 10:26 PM IST
जर्मनीच्या रस्त्यांवर 'परभणी'चे ड्रायव्हर; ST महामंडळाकडून थेट इंटनॅशनल नोकरीची ऑफर  title=

Maharashtra State Road Transport Corporation : तुम्हाला ट्रक, बस किंवा अवजड वाहनं चालवता येतात का? तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? मग तुम्हाला थेट सातासमुद्रापार जर्मनीत करिअर करण्याची संधी आहे.. जर्मनीच्या बाडेन-युटेनबर्ग या राज्याला सध्या कुशल ड्रायव्हर्सची कमतरता भासतेय. त्यामुळंच कुशल ड्रायव्हरचा पुरवठा करण्यासाठी बाडेन-युटेनबर्ग राज्यानं महाराष्ट्राशी सामंजस्य करार केलाय.. त्यानुसार राज्य सरकारच्या परिवहन विभागानं आता चांगल्या ड्रायव्हर्सचा शोध घ्यायला सुरूवात केलीय...

जर्मनीला कुशल ड्रायव्हर उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे.  त्यानुसार कुशल ड्रायव्हर शोधण्याचे आदेश सर्व आरटीओंना पाठवण्यात आलेत.  जर्मनीत काम करायला इच्छुक असलेल्यांना क्युआर कोड स्कॅन करून अर्ज भरावा लागणार आहे. 

ड्रायव्हिंग परवान्यासह विविध कागदपत्रं अर्जासोबत जोडावी लागतील.  मात्र या ड्रायव्हर उमेदवारांना जर्मन भाषा येणं बंधनकारक असणार आहे.  जर्मनीत लेफ्ट हँड ड्रायव्हिंग केली जात असल्यानं त्याबाबतचे नियम उमेदवारांना माहिती असणे आवश्यक आहे. 

प्रगतीची संधी कुणाला कधी कशी मिळेल, हे सांगता येत नाही.. जर्मनीतल्या लॉजिस्टिक, आर्थिक आणि परिवहन कंपन्यांना सध्या कुशल ट्रक आणि बस ड्रायव्हर मिळत नाहीयत... त्यामुळंच महाराष्ट्रासोबत करार करण्याची वेळ जर्मन सरकारवर आलीय.. आता थेट विदेशात हॉर्न वाजवण्याची संधी मराठमोळ्या उमेदवारांना असणाराय..

गणपतीसाठी एसटीच्या जादा बसेस

पंढरीच्या वारीनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते गणपती बाप्पांच्या आगमनाचे.. कोकणवासियांसाठी गणेशोत्सव तर मोठा सण.. त्यामुळे कोकणात गावी जाणा-या मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय... 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरदरम्यान 4 हजार 300 एसटी बसेस सोडणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येतील. चाकरमान्यांना ऑनलाइन बुकिंगही करता येणार आहे..