close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ठाण्यात मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या

मुलीची हत्या करुन आईने स्वत:लाही संपवले.

Updated: Aug 10, 2019, 09:41 AM IST
ठाण्यात मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या

ठाणे : शहरातील कळवा भागतील मनिषानगरमध्ये धक्कादायक घटना घडली. येथे राहणारे प्रशांत पारकर यांची पत्नी प्रज्ञा पारकर (३९) हिने मुलगी श्रुती पारकर (१८) हिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रज्ञा यांनी स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी एक चिठ्ठी घरात पोलिसांना मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

प्रशांत पारकर हे पत्नी प्रज्ञा आणि मुलगी श्रुती असे कळवा येथे राहत होते. शुक्रवारी सकाळी प्रशांत हे व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडले. ते व्यायामशाळेत नेहमीप्रमाणे गेले. त्यानंतर घरी पत्नी प्रज्ञा आणि मुलगी श्रुती या दोघीच घरी होत्या. ज्यावेळी प्रशांत हे व्यायामशाळेतून घरी परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या पाया खालची जमीन सरकले. समोरचा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. श्रुती बेशुद्ध अवस्थेत दिसली तर पत्नी प्रज्ञा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रशांत यांनी याबाबत कळवा पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रज्ञा हिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना घरामध्ये सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये तिने श्रुतीच्या हत्येची कबुली दिली आहे. तसेच आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीत म्हटले आहे, अशी माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली. तिने श्रुतीचा खून का केला आणि आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. अधिक तपास सुरु आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.