ठाण्यातील सिटी मॉल आग शर्थीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात

ठाणे शहरातील सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर मोठी आग लागली. 

Updated: Feb 15, 2020, 04:38 PM IST
ठाण्यातील सिटी मॉल आग शर्थीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात title=

ठाणे : शहरातील सिटी मॉलच्या (City Mall ) पहिल्या मजल्यावर मोठी आग (Thane Fire ) लागली. ही घटना कापूरबावडी (Kapurbavdi) परिसरातील घडली असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या प्रयत्नानंतर ही आग  आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या रवाना झाल्याअसून त्यांच्यामाध्यमातून आग विजवण्याचे काम करण्यात आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आगीनंतर प्रचंड धूर झाला होता. दरम्यान, हा परिसर वर्दळीचा असल्याने एकच धावपळ उडाली होती.

मॉलला आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मॉलमधील वरच्या मजल्यावर अडकलेल्या एकाला सुरक्षित बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाला नाही, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.