Mumbai AC Local: वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली

Mumbai AC Local Train: अचानक वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. यामुळे AC लोकलने प्रवास कणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. ट्रेन अर्धा तास स्टेशनवरच थांबली होती. 

Updated: Jun 6, 2023, 01:12 PM IST
Mumbai AC Local: वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली  title=

Mumbai AC Local Train : प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद आणि गारेगार व्हावा यासाठी रेल्वे तर्फे पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, याच AC लोकल  प्रवाशांसाठी त्रासदा.क आणि डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील नायगाव रेल्वे स्थानकात प्रवाशांनी याचा अनुभव घेतला. वातानुकुलीत यंत्रणा बंद पडल्याने AC लोकल  नायगाव रेल्वे स्थानकात ट्रेन अर्धा तास थांबली होती. मात्र, प्रवाशांनी गोंधळ घातल्यामुळे ही AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली गेली. 

वातानुकुलीत यंत्रणा अचानक बंद पडली

विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी एसी लोकल सोमवारी सकाळी नायगाव रेल्वे स्थानकात अर्ध्या तासाहून अधिक वेळ तात्काळत उभी होती. ट्रेनमधील वातानुकुलीत यंत्रणा अचानक बंद झाल्याने ही ट्रेन नायगाव रेल्वे स्थानकात अर्धा तास थांबली होती. यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. रेल्वेकडून होतं असलेल्या या गैरसोयीमुळे प्रवासी व मोटारमन यांच्यात वाद झाला होता. अखेर स्टेशन मास्तरने मध्यस्थी घेत समजूत काढल्यानंतर हा वाद मिटला.  मात्र, ट्रेनची वातानूकुलीत यंत्रणा सुरुचं झाली नसल्याने अखेर या ट्रेनचे दरवाजे उघडे ठेवून ती पुढे नेण्यात आली. अर्ध्या तासाहून अधिक वेळ या ट्रेनला उशीर झाल्याने प्रवाशांना कामाच्या ठिकाणी उशिरा पोहचावे लागले. या ट्रेनमुळे पश्चिम रेल्वेवरील इतर लोकलची वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.

चर्चगेटहून विरारला जाणा-या एसी लोकलमध्ये प्रवासी अडकले

यापूर्वी देखील पश्चिम रेल्वे मार्गावर असाच प्रकार घडला होता. चर्चगेटहून विरारला जाणा-या एसी लोकलमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. नालासोपारा स्थानकात एसी लोकलचे दरवाजेच न उघडल्यानं प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती.  अनेक प्रवाशांनी रल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र रेल्वेप्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रवाशांनी केला.

मुंबईच्या सर्वच लोकल एसी करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न

मुंबईच्या सर्वच लोकल एसी करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. नुकतीच शिंदे फडणवीस सरकारने एमयूटीपी 3 ए प्रकल्पासाठी सात हजार कोटींचं कर्ज उभारण्यास मंजुरी दिली. त्यामुळे मुंबई लोकल सेवा एसी करण्यासाठी आता एमआरव्हीसीने कंबर कसली आहे. यासाठी सर्वेक्षणही सुरू झालंय. एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आलंय. वर्षभरात त्याचा अहवाल सादर होईल. मुंबईत 238 एसी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात एमयूटीपी 3 मधील 47 तर एमयूटीपी 3 ए मधील 191 लोकलचा समावेश आहे. राज्यात सत्ताबदलानंतर सरकारने सुधारित प्रकल्पाला अर्थसहाय्य उभारण्यासाठी मंजुरी दिलीय. त्यामुळे कर्ज उभारणीच्या प्रक्रियेला वेग आलाय. लवकरच एसी लोकलची निर्मितीही सुरू होत आहे.