नागपूर : जीएसटीचा सर्वाधिक फायदा हा नागपूरला होणार असल्याचा दावा केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपुरात गोपाळकृष्ण गोखले व्याख्यानमाला अंतर्गत जीएसटी विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या मध्यभागी नागपूर असल्याने नागपूर लॉजिस्टिक हब होण्याच्या वाटेवर आहे.
अनेक मोठ्या कंपन्या आणि व्यापारी नागपूरात माल गोडाऊनसाठी जागा शोधत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. एकुणच देशात जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापार वाढून देश आर्थिक प्रगतीच्या वाटेवर चालणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते आणि दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.