तब्बल 1500 किलोचा देवमासा जाळ्यात; बोटमालकाने नुकसान सहन केलं परंतु माश्याला जीवनदान दिलं

भाईंदरच्या उत्तन समुद्रात १० नोटिकल अंतरावर बुधवारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सहारा बोटीच्या जाळ्यात देवमासा अडकल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: May 13, 2021, 07:55 AM IST
तब्बल 1500 किलोचा देवमासा जाळ्यात; बोटमालकाने नुकसान सहन केलं परंतु माश्याला जीवनदान दिलं

भाईंदर : भाईंदरच्या उत्तन समुद्रात १० नोटिकल अंतरावर बुधवारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सहारा बोटीच्या जाळ्यात देवमासा अडकल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तनच्या समुद्रात सापडलेला मासा अंदाजे 15 ते 20 फुट लांब होता. एव्हढा मोठा मासा जाळ्यात आल्याने बोटीवरील मच्छिमारांची एकच तारांबळ उडाली. देवमाश्याचे वजन जवळपास 1500 किलो असल्याचे सांगितले जात आहे. 

जाळ्यात अडकलेल्या महाकाय देवमाश्याला जीवनदान देण्याचे मच्छिमारांनी ठरवले. त्याला सोडवण्यासाठी मच्छिमारांनी 2 तास प्रयत्न केले.  दोन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर मच्छिमारांनी जाळे कापून त्याची सूटका केली.

देवमाशाला जीवनदान देण्याऱ्या बोटमालक डेव्हिड गऱ्या यांच्या बोटीचे आणि जाळ्याचे नुकसान झाले आहे.

त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला होता. त्या आधारे मत्सविभागाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.