पुण्यात एक मोठी दुर्घटना टळली

बसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवासी होते. बसनं पेट घेतल्याचं समजताच सगळ्या प्रवाशांनी बसच्या खिडक्यांमधून उड्या टाकल्या. 

Jaywant Patil Updated: Mar 30, 2018, 12:06 AM IST
पुण्यात एक मोठी दुर्घटना टळली title=

पुणे : पुण्यात एक मोठ्ठी दुर्घटना टळली आहे. पुण्यात खचाखच भरलेल्या एका बसला आग लागली. नगर पुणे रोडवर बीआरटी मार्गावर असताना या बसनं पेट घेतला. निगडी ते वाघोली दरम्यान धावणारी ही बस होती. सकाळी सव्वा दहाच्या सुमाराला पुणे - नगर रस्त्यावर इनऑर्बिट मॉलसमोर असताना बसला आग लागली. बसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवासी होते. बसनं पेट घेतल्याचं समजताच सगळ्या प्रवाशांनी बसच्या खिडक्यांमधून उड्या टाकल्या. 

महत्वाचं म्हणजे सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. बसमध्ये आग पसरण्याआधीच प्रवाशांनी उड्या टाकल्या. ही बस मात्र पूर्णपणे जळून खाक झालीय. आगीमागचं कारण अजून समजू शकलेलं नाही.