हिंगोलीत वीज पडून बैलाचा मृत्यू

हिंगोली तालुक्यात मुसळधार पाऊस

Updated: Jun 24, 2019, 08:20 PM IST
हिंगोलीत वीज पडून बैलाचा मृत्यू title=
प्रतिकात्मक फोटो

हिंगोली : मृगात न आलेला मान्सूनचा पाऊस अखेर आज परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात बरसला. दुपारच्या सुमारास कळमनुरी आणि हिंगोली तालुक्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. जोरदार आलेल्या पावसाने शेतात जागोजागी पाणी साचले होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास औंढा आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे.

जवळा बाजारपासून जवळच असलेल्या पोटा शेळके येथील विष्णु निवृत्ती शेळके यांच्या शेतातील झाडावर वीज पडली. वीज पडून झाडाखाली असलेल्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा जिंतूर आणि परभणी शहर परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कापूस लागवड हळद लागवडी सुरुवात होऊ शकणार आहे. लांबणीवर पडलेल्या पेरण्यांना या पावसाच्या आगमनामुळे सुरुवात होऊ शकेल.