डोंबिवलीत चक्क चोरांने स्वत:ला घेतले कोंडून आणि ...

चोर चोरी करतो आणि जेव्हा त्याची फजिती होते त्यावेळी त्याची कशी भंबेरी उडते हे डोंबिवलीत पाहायला मिळाले. 

Updated: Feb 5, 2019, 11:14 PM IST
डोंबिवलीत चक्क चोरांने स्वत:ला घेतले कोंडून आणि ... title=

ठाणे : चोर चोरी करतो आणि जेव्हा त्याची फजिती होते त्यावेळी त्याची कशी भंबेरी उडते हे डोंबिवलीत पाहायला मिळाले. जुन्या डोंबिवलीतील तुलसी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. इथल्या एका बंद घरात एक चोरी शिरला होता. मात्र या चोराबाबत स्थानिकांना कळलं आणि याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. आता पकडलो गेलो तर खैर नाही आणि नागरिक चोप देतील या भीतीने चोरट्याने स्वतःलाच या घरात कोंडून घेतले.

अखेर या ठिकाणी पोलीस पोहोचले. घराचा दरवाजा उघडण्यासाठी पोलिसांना चोरट्याकडे विनवणी करावी लागली. अखेर पोलिसांच्या विनंतीनंतर या चोराने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच विष्णूनगर पोलिसांनी चोराला अटक केली. विशेष म्हणजे शब्बीर नावाचा हा चोर ३१ जानेवारीला जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.