वर्धा : पोलीस अधीक्षक कार्यालय सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या व्यावसायिकांचे कुलूपबंद घराला चोरट्यानं लक्ष केलं. सुनील उमरे यांच्या घरी चोरांनी डल्ला मारला. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या परिसरात चोरी झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. सदर घर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या बाजूला असल्याने पोलिसांच्या समोर मोठं आव्हान उभं झालं आहे.
चोरट्यांनी या घरात चोरी करून दारूची पार्टी केल्याची पोलिसांकडून माहिती सुद्धा सांगण्यात येत आहे. तर घरातील असलेल्या हल्दीराम रसगुल्लावर डल्ला सुद्धा मारल्याच पोलीस तपासात उघड झाले आहे. वर्धा शहर या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.