चांगली बातमी । पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधित तीन रुग्ण ठणठणीत

पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीला कोरोना बाधित झालेल्या तीन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. 

Updated: Mar 27, 2020, 04:38 PM IST
चांगली बातमी । पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधित तीन रुग्ण ठणठणीत  title=
संग्रहित छाया

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीला कोरोना बाधित झालेल्या तीन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. हे तीन ही रुग्ण दुबई वरून आले होते. १४ दिवसानंतर घेतलेल्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल ही गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले.! या वेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी टाळ्या वाजवत या रुग्णांना निरोप दिला. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित १२ रुग्ण होते, त्यातल्या तीन जणांना आता घरी सोडण्यात आलंय..! विशेष म्हणजे गेल्या सात दिवसात शहरात कोरोनाचा एक ही रुग्ण वाढलेला नाही.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. आज सांगलीत आणखी १२ रूग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याने हा आकडा आज १२ ने वाढला. सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. आज ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यामध्ये ६ महिला आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील व्यक्ती आहेत. सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंतेचं वातावरण आहे. तर नागपुरात ही आज नवे ५ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करत आहे.