पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

नाशिकच्या विहितगाव परिसरातील घटना

Updated: Sep 30, 2019, 12:05 PM IST
पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये  वाढदिवशीच तीन वर्षांचा चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी नाशिकच्या विहितगाव परिसरात ही घटना घडली. अवधूत सचिन वाघ असे या चिमुकल्याचे नाव आहे.

खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांकडून तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. एका बाजूला वाढदिवसाची तयारी सुरू असतांना ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. पालकांच्या दुर्लक्षतेमुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.