ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

नदीच्या दोन्ही काठांवर दोरखंड बांधून सगळ्यांना सुखरुप बाहेर काढले.

Updated: Sep 16, 2020, 12:03 PM IST
ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मेळघाटातल्या कलाकुंड, बगदारी धबधबा येथे अडकलेल्या पर्यटकांना तब्बल दीड तासांनंतर वाचवण्यात आलं आहे. मेळघाटात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने काही पर्यटक दाखल झाले होते. सकाळी साडेदहा वाजता हे पर्यटक येथे आले तेव्हा ऊन होतं. पण थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरु झाला आणि बगदारी धबधब्यातील पाण्याचा प्रवाह कमालीचा वाढला. नदीला देखील मोठा पूर आल्याने जवळपास दीड तास हे गिर्यारोहक आणि पर्यटक अडकून पडले होते. 

अशा परिस्थितीत घाबरुन न जाता दीड तास नदी काठी विश्रांती घेतल्यानंतर, या गिर्यारोहकांनी कामाच्या अनुभवातून नदीच्या दोन्ही काठांवर दोरखंड बांधून सगळ्यांना सुखरुप बाहेर काढले. 

पावसाळा म्हटलं की गिर्यारोहकांसाठी एक पर्वणीच असते. दरवर्षी हजारो गिर्यारोहक हे निसर्गाच्या सानिध्यात, दऱ्याखोऱ्यात असलेल्या मेळघाटात ट्रेकिंगसाठी येत असताना. मात्र यावर्षी अनलॉक चारमध्ये विदर्भातील नागपूर, अमरावती पुलगाव, परतवाडा अशा ठिकाणांहून आलेल्या पन्नास पेक्षा अधिक गिर्यारोहकानीं ट्रेकिंगच्या माध्यमातून, मेळघाटातील कलाकुंड, बगदारी येथील नदीला आलेल्या पुरातून जीव वाचविण्याचा थरार अनुभवला.

रविवारी सुटीचा दिवस असल्याने गिर्यारोहक मेळघाटात आले होते. सकाळी १०-३० च्या सुमारास हे गिर्यारोहक जेव्हा दाखल झाले तेव्हा ऊन होते. हे सर्व गिर्यारोहक कलाकुंड, बगदारी धबधबा जवळ पोहचले. यादरम्यान अचानक पाऊस सुरु झाल्याने धबधब्यामधील पाण्याचा प्रवाह वाढला आणि नदीला देखील मोठा पूर आला. जवळपास दीड तास हे गिर्यारोहक आणि पर्यटक अडकून पडले होते. मात्र, गिर्यारोहकांच्या ट्रेकिंगच्या अनुभवातून, नदीच्या दोन्ही काठांवर दोरखंड बांधून त्यांनी सर्वांना सुखरुप बाहेर काढले.