Trichy Airport Video: 36000 फुट उंचीवर अडीच तास सुरू होता मृत्यूचा थरार, महाराष्ट्राच्या लेकीने वाचवला 140 प्रवाशांचा जीव, कोण होती 'ती'?

टेकऑफनंतर 36000 फुट उंचीवर अडीच तास मृत्यूचा थरार सुरु होता. विमानात असलेले 140 प्रवाशी जीव मुठीत घेऊन बसले होते. तेव्हा पुण्याच्या या लेकीने त्यांचे जीव वाचवले. 

नेहा चौधरी | Updated: Oct 13, 2024, 03:36 PM IST
Trichy Airport Video: 36000 फुट उंचीवर अडीच तास सुरू होता मृत्यूचा थरार, महाराष्ट्राच्या लेकीने वाचवला 140 प्रवाशांचा जीव, कोण होती 'ती'? title=
Trichy Airport emergency landing co pilot maitryee shitole Pune saved the lives of 140 passengers

Air India Express Flight Emergency Landing : तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिची विमानतळावर (Trichy Airport) विमानाने टेकऑफ केल्यानंतर मृत्यूचा थरार पाहिला मिळाला. शुक्रवारी (11 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 वाजता विमानतळावर नेहमी प्रमाणे लगबग होती. पण अचानक त्या एका घटनेनंतर विमानतळावरील वातावरण भीतीच्या सावलीत होतं. अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु झाली, जेव्हा त्यांना कळलं 140 प्रवाशी असलेल्या फ्लाइट IX 613 ची 36000 फुट उंचीवर असताना त्यात बिघाड झालाय. हायड्रॉलिक सिस्टिम अचानक निकामी झाल्याने वैमानिकांसह प्रवाशांनी मृत्यूचा थरार अनुभवला. पण पुण्यातील लेकीने सर्वांचं जीव वाचवले. 

140 प्रवाशांचा जीव वाचवणारी कोण होती 'ती'?

विमानात बिघाड झाल्यामुळे आता सेफ लँडिंग करण्याची होती. अशात सगळ्यात मोठी जबाबदारी होती वैमानिकांची. अधिकाऱ्यांनी विमानतळावर इमर्जन्सी घोषित केली. सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावर 20 हून अधिक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल जे काही होईल त्यासाठी सज्ज होते. पण अधिकाऱ्यांना त्या दोन वैमानिकांवर विश्वास होता.

हे विमान एअर इंडिया फ्लाइटचे पायलट क्रोम रिफादली फहमी झैनाल आणि सह-वैमानिक मैत्रेयी शितोळे उडवत होते. अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे विमान या दोघांनी धावपट्टीवर सुरक्षीत लँड केलं. ही कामगिरी करुन दाखवणारी सह-वैमानिक मैत्रेयी शितोळे ही पुण्याची लेक आहे. (Trichy Airport emergency landing co pilot maitryee shitole maharashtra Pune saved the lives of 140 passengers)

मैत्रेयी शितोळेने न्यूझीलंडमधील मेनलँड एव्हिएशन कॉलेज, ड्युनेडिन येथे प्रशिक्षण घेतलं असून तिने न्यूझीलंडमध्येच व्यावसायिक पायलट म्हणून काम सुरू केलं होतं. त्यानंतर मैत्रेयीने मायभूमी भारतात काम करण्याचा निर्णय घेतला.  नोव्हेंबर 2019 पासून ग्राउंड इन्स्ट्रक्टर म्हणून काम सुरू केलं. एअर नेव्हिगेशन, तांत्रिक, उड्डाणाच्या इथिकल गोष्टी या गोष्टीत मैत्रीने प्राविण्य मिळवलं. मैत्रेयी शितोळेने वैमानिक होण्याआधी फिजिक्समध्ये डिग्री मिळवली आहे. आज महाराष्ट्राच्या या लेकीचा सर्वांना अभिमान आहे.