close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्यात ट्रकने दोन बाईक चिरडल्या, चार जणांचा मृत्यू

मद्यधुंद ट्रकचालकानं चौघांचा बळी घेतल्याची घटना पुणे येथे  घडली.

Updated: Sep 11, 2019, 12:37 PM IST
पुण्यात ट्रकने दोन बाईक चिरडल्या, चार जणांचा मृत्यू

पुणे : मद्यधुंद ट्रकचालकानं चौघांचा बळी घेतल्याची घटना पुणे - पौड रस्त्यावर घडली आहे. बुधवारी रात्री लवळे फाट्यावर हा अपघात झाला. पिरंगुट घाटातून पौडकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने उतारावर असताना २ ते ३ दुचांकींना धडक देत फरफटत नेले. या घटनेत दुचाकीवरील २ तरुण आणि २ तरुणींचा मृत्यू झाला.

वैष्णवी सोनवणे, पूजा पाटील, नागेश गव्हाणे, सुरज राठोड अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकाला वाहतूक पोलीस आणि नागरिकांनी पाठलाग करुन पकडले. त्यावेळी त्याने मद्य प्राशन केल्याचं निदर्शनास आले. अपघात होत असताना वेगानं येत असलेला ट्रक सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले आहे.