इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण आज इंदापूर इथे पार पडत आहे. कस्तुरबा कदम विद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडणार आहे. आज सकाळी पालखी निमगाव केतकीहून इंदापूरकडे मार्गस्थ झाली असून थोड्याच वेळात या रिंगण सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तर हा अभुतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी अनेक विठ्ठल भक्तांनी इथे मोठी गर्दी केली आहे.

Updated: Jun 27, 2017, 12:08 PM IST
इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण title=

इंदापूर : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण आज इंदापूर इथे पार पडत आहे. कस्तुरबा कदम विद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडणार आहे. आज सकाळी पालखी निमगाव केतकीहून इंदापूरकडे मार्गस्थ झाली असून थोड्याच वेळात या रिंगण सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तर हा अभुतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी अनेक विठ्ठल भक्तांनी इथे मोठी गर्दी केली आहे.

आज रिंगण सोहळा पाहण्यासाठी अनेक वारकरी इंदापूरमध्ये दाखल झालेत तर वारक-यांच्या स्वागतासाठी इंदापूर सज्ज झालं आहे.