तुळशी विवाह : अगदी थाटामाटात पार पडलं लग्न

अनोखं लग्न 

Updated: Nov 29, 2020, 08:23 AM IST
तुळशी विवाह : अगदी थाटामाटात पार पडलं लग्न

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोल्यात एक  आगळं-वेगळं लग्न (Tulsi Vivah) पार पडलंय.  हे लग्नही इतर लग्नासारखच होतं. मात्र काहीसं जरा हटके....लग्नात वाजंत्री, पाहुणे, जेवणावळी, मानपान असं सर्व काही होतंय...अकोल्यातील शास्त्रीनगर भागात झालेलं हे लग्नं होतंय अगदी खऱ्या- खुऱ्या लग्नासारखं... यातून उत्सवासह सामाजिक संदेशांची पेरणीही करण्यात आलीय.... आता या लग्नाविषयी अनेक प्रश्नांच काहूर तूमच्या डोक्यात उठलं असेल...मग, याची उत्तरं शोधण्यासाठी चला थेट जाऊयात अकोल्यातील या लग्नाला.....

वाजंत्री,वऱ्हाडी मंडळींची लगबग..वरपक्षाची सरबराई करण्यासाठी वधुपक्षाची धावपळ...नवऱ्या मुलांकडील वर्हांड्यांची मिरवणुक....कोणत्याही लग्नातील असंच  काहीसं चित्र आणि नजारा असतोय....याही लग्नात सर्व काही असंच होतंय...पण तरीही हे लग्न अतिशय "स्पेशल" होतंय..... हे लग्न होतंय तुळशीचं... अकोल्यातील शास्त्रीनगर भागातील उमादेवी आणि निता शर्मा या सासू-सूना सहा वर्षांपासून भव्य प्रमाणात तुळशीविवाह साजरा करतात. 

या लग्नासाठी त्यांचं सारं घर रोषणाई, दिवे, रांगोळ्या अन फुलांच्या आराशीनं सजलं होतंय..बाळकृष्णची वरात निघाली,वऱ्हाडी नाचले त्यांचे स्वागतही करण्यात आले ...बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावण्यात आला ...कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करण्यात आले, त्यानंतर मंत्रपुष्प आणि आरती सुद्धा करण्यात आली.

मात्र हे सर्व काही साध्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुचवलेल्या निर्देशानुसार..मुलीला आंदण म्हणून सॅनिटायझर , मास्क देण्यात आलं..तर सजावटीत कोरोना योधांनचा सन्मान करण्यात आला असून कोरोनापासून बचाव साठी जनजागृती म्हणून फलक लावण्यात आले..