धक्कादायक ! तरुणीचा विनयभंग करत धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न

धक्कादायक घटना आली समोर

Updated: Nov 28, 2020, 05:28 PM IST
धक्कादायक ! तरुणीचा विनयभंग करत धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न

आतिष भोईर, कल्याण : तरुणीचा विनयभंग करुन तिला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न आठगाव ते कसारा या रेल्वे स्थानकादरम्यान घडल्याची धक्कादायक घटना पुढे आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे.

मध्य रेल्वेच्या आठगाव ते कसारा या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका तरुणीची दोन तरुणांनी छेड काढली. या तरुणीने प्रतिकार केला असता या माथेफिरू तरुणांनी तिला चक्क ट्रेन झाली फेकून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तोपर्यंत लोकल कसारा रेल्वे स्थानकात पोहचल्याने यामधील एका तरुणांने पळ काढला तर दुसऱ्या तरुणाला तिच्या नातेवाईकानी पकडले. त्यामुळे तरुणी बचावली.

या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली. अमोल जाधव आणि अमन हिले अशी या आरोपींची नाव आहेत.