भाजपला शिवसेनेचा दे धक्का, जळगावनंतर आता 'या' पालिकेत दणका

सध्या राज्यात राजकीय वातावरण जोरदार तापलेले दिसून येत आहे. हे सगळे एकीकडे सुरु असताना शिवसेनेने जगळगावनंतर भाजपला जोरदार दे धक्का दिला आहे.

Updated: Jun 21, 2021, 08:59 PM IST
भाजपला शिवसेनेचा दे धक्का, जळगावनंतर आता 'या' पालिकेत दणका title=

वर्धा : सध्या राज्यात राजकीय वातावरण जोरदार तापलेले दिसून येत आहे. काँग्रेसने स्वबळाची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. तर शिवसेनेनेही याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजपने टोला लगावला आहे. हे सगळे एकीकडे सुरु असताना शिवसेनेने जगळगावनंतर भाजपला जोरदार दे धक्का दिला आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपरिषदेतील भाजपचे 10 नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवक अशा बारा लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजप युवा मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या हा भाजपला विदर्भात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. (12 BJP corporators and 2 former corporators from Hinganghat Municipal Council have joined the Shiv Sena)

दरम्यान, हिंगणघाट येथे 38 नगरसेवक आहेत. त्यापैकी 28 नगरसेवक भाजपचे होते. आणखी काही नगरसेवक प्रवेश करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी दिली. शिवसेना  पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. आता तर सुरुवात झाली आहे. आणखीन पंचायत समिती आणि अन्य अनेक लोक प्रवेश करणार आहेत, अशी माहिती अनंतराव गुढे यांनी दिली.

भविष्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेना भक्कम कशी करावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. लवकरच निवडणूक आहे. तेव्हा हिंगणघाट नगर परिषदेमध्ये बदल घडवून आणू आणि निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास यावेळी अनंतराव गुढे यांनी माहिती देताना व्यक्त केला.

आता नगरसेवक आलेत, नंतर आमदारही येतील. कापसच्या गंजीला लागलेली आग लवकर समजत नाही. ती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना नंतर समजेल, असा टोला अनंतराव गुढे यांनी यावेळी भाजपला लगावला.