close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

परभणीत लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू

ऐन दिवाळीत परिसरात शोककळा

Updated: Nov 8, 2018, 05:11 PM IST
परभणीत लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो

परभणी : परभणी जिल्ह्यात लसीकरण केलेल्या दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पालम तालुक्यातील रोकडेवाडीत डिसीजी आणि डीपीडी या प्रतिबंधात्मक लसी दिल्यानंतर तीन महिन्यांच्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय... तर दोन बालकांवर आंबाजोगाईमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

रोकडेवाडी इथल्या आरोग्य केंद्रात कर्मचारी निलेवाड यांनी काही बालकांचे लसीकरण केले. गोपाळ रामकीशन सकनूर आणि राम निळे या तीन महिन्यांच्या चिमुकल्यांचा लसीकरणानंतर काही तासात मृत्यू झाला.

तर दत्तराव भकाने यांची मुलगी विद्या हिला अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ऐन दिवाळीत एकच शोककळा पसरली आहे.