close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंची नवी खेळी?

 महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना

Updated: Nov 8, 2018, 01:06 PM IST
लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंची नवी खेळी?

पुणे : मराठा मोर्चाचा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना सुरेश पाटील यांनी केलीय. पाडव्याच्या मुहूर्तावर सह्याद्रीतल्या रायरेश्वर इथं पक्षाची स्थापना केलीय. महाराष्ट्र क्रांती सेना असं या पक्षाचं नाव ठेवण्यात आलंय. 

पुण्यातील भोर तालुक्यात असलेल्या रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी खा. छत्रपती उदयनराजेंचे फोटो असलेले बॅनर्स या ठिकाणी पहायला मिळाले. 

या कार्यक्रमास शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसेच खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संपूर्ण पाठिंबा दिला असून लोकसभा निवडणुकीसाठी खा. उदयनराजे हे आमचे पुढचे उमेदवार असू शकतात, आपण आमच्या पक्षातून निवडणूक लढवावी तशी विनंती राजेंना करणार असल्याचं महाराष्ट्र क्रांती सेनेचे पक्ष प्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितलंय.

उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी साताऱ्यात सद्य राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला कुणीही विरोध केलेला नाही, आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारंनी सांगितलं होतं.