अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावच्या हिंगणी बंधा-यात बुडून दोन कॉलेज तरुणांचा मृत्यू झालाय. या बंधा-यावर 4 कॉलेज तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण बुडाले.
सुदैवाने या चौघांपैकी 2 तरुण बचावलेत. सार्थक लांडे आणि संतोष सोनवणे अशी मृत तरुणांची नावं आहेत. पावसाळ्यानंतर पर्यटनाच्या ठिकाणी तसेच तलावांमध्ये पोहण्याचं प्रमाण वाढलं आहे, यात दुर्देवाने अपघातांचं प्रमाणंही वाढलं आहे, तरी अशा ठिकाणी काळजी घेण्याची गरज वाढली आहे.