देवी विसर्जनाला गालबोट, दोघांचा नदीत बुडून मृत्यू

 Maharashtra: Two children drown in river : रायगड जिल्ह्यात काल देवी विसर्जनाला गालबोट लागले आहे. 

Updated: Oct 16, 2021, 08:39 AM IST
देवी विसर्जनाला गालबोट, दोघांचा नदीत बुडून मृत्यू

अलिबाग : Maharashtra: Two children drown in river : रायगड जिल्ह्यात काल देवी विसर्जनाला गालबोट लागले आहे. येथील अंबा नदीत देवी विसर्जनाला गेलेले दोघे बुडाले. त्यांचा शोध घेतला असताना काहीही उपयोग झाला नाही. या दोघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. (Two drowned in Amba river in Raigad)

रायगडमधील पालीजवळ राबगाव इथे अंबा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी देवी विसर्जनादरम्यान ही घटना घडली. शिवेंद्र चौहान आणि विवेक लहाने अशी मृतांची नावे आहेत. संध्याकाळी विसर्जनावेळी दगडावरून पाय घसरून दोघे नदीत पडले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी दोघांचेही मृतदेह पालीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले.