close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटील झाला आहे. कुत्रा चावल्यामुळे  दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.  

Updated: Sep 11, 2019, 03:31 PM IST
भटक्या कुत्र्याच्या चाव्याने  दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

औरंगाबाद : भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटील झाला आहे. कुत्रा चावल्यामुळे अक्षदा वावरे या दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. आज सकाळी अक्षदाच्या डोक्याला कुत्रा चावला. औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली. कुत्र्याने चावा घेतल्यावर उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. 

ही लहान मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळी भटक्या कुत्र्याने हल्ला केला. तिच्या अंगावर झडप घालून कुत्र्याने तिचा चावा घेतला. त्याचवेळी कुत्र्याने तिच्या डोक्यालाही चावा घेतला. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांबाबत वारंवार तक्रारही करण्यात आली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. चिमुकली अंगणात घेळत होती. काय तिचा दोष आहे. ना कर्त्या प्रशासनाच्या हलगर्जीपणा वावरे कुटुंबीयांच्या दु:खाला कारणाभूत आहे. तक्रार करुनही लक्ष न दिल्यामुळेच ही दुदैवी घटना घडल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.