सातऱ्यात उदयनराजेंची तोफ धडाडली, काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका

उदयराजे भोसले यांनी टीकाकरांना धारेवर धरलं...

Updated: Sep 15, 2019, 07:35 PM IST
सातऱ्यात उदयनराजेंची तोफ धडाडली, काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका title=

सातारा : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात पोहोचली. यावेळी मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार स्वागत करण्यात आलं. साताऱ्याचे दोन्ही मोठे नेते उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये आल्याने सातारा संपूर्ण भाजपमय झाल्याचं पाहायला मिळालं. आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा या ठिकाणी झाली. यावेळी व्यासपीठावर दोन्ही राजे उपस्थित होते. उदयनराजे भोसले यांनी यावेळी जोरदार भाषण करत काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली.

उदयनराजे भोसले यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

- मी राजीनामा देवून आलो... आणि लोक फटाकडे वाजवत होते; गुलाल उधळत होते. पण ही सातारकर यांची स्टाईल आहे.

- एक - दोन नाही...तर आयुष्याच्या 15 वर्षांनंतर असा निर्णय मी का घेतला ?  याचा विचार टीकाकरांनी करावा.

- पंधरा वर्षे आमच्या नावावर फुली होती; आमची फाईल डस्टबिनमध्ये टाकली जात होती. इतकं सहन केलं. त्यासाठी किमान राष्ट्रवादीनं मला शहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता.

- जी काम केली ती रेटून केली म्हणून झाली. सत्तेत असताना 1 रुपयांच काम झालं नाही.

- नळावर भांडण असतं तसं भांडाव लागलं. 

- विरोधी खासदार असताना देखील युतीच्या काळात साताऱ्यामध्ये 680 कोटी रुपयांची काम केली. 15 हजार कोटीची रेल्वेची कामे केली. 

- मुख्यमंत्री आधी देखील होते आणि आता देखील आहेत. - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका

- फाईलवर सही करण्यासाठी त्याच्या पेन मधील शाई संपली असेल असं मला वाटलं. म्हणून पेन घेवून गेलो. पण सही न करता इल्ला म्हणत पेन खिशाला लावला.

- मी विचार केला...यांनी 15 वर्षात केलं नाही मग आत्ता काय करणार. माझा बँड वाजवण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला होता. माझा बँड कोणी वाजवू शकत नाही. कारण माझा बँड फक्त मीच वाजवतो. कारण मीच बँड मास्टर आहे.

- तुम्ही थांब म्हटलं तर मी थांबायला तयार आहे. पण तुम्ही थांब म्हणणार नाही याची खात्री मला आहे.

- ईव्हीएम बाबत मला देखील संशय होता. पण मी बसून विचार केला.

- जर मुख्यमंत्री काम करत असतील...काम मार्गी लागत असतील तर त्यांना मदत होणार

- विकासाचा दृष्टकोन ठेवून सर्वांची काम मार्गी लावले.

- कृष्णा खोरे प्रकल्प हा काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षाने राबवायला हवा होता. कृष्णा खोरेचे काम 2006 सालीच व्हायला हवं होतं. पण अद्याप ती कामं झालेली नाही.

- प्रकल्पाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यावेळी हे प्रकल्प का पूर्ण का झालं नाही. त्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करा. जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

- आपल्या पक्षाची अवस्था अशी का झाली याबाबत आत्मचिंतन केलं असंत तर आता आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसती.