Shiv Sena Mashal symbol Controversy Samata Party: शिंदे आणि ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.मशाल चिन्हाबाबत मोठी अपडेट आहे. मशाल चिन्ह ठाकरेंना देऊ नये अशी मागणी समता पक्षाचे निवडणूक आयोगाकडे केली. या संदर्भात समता पक्षाने निवडणुक आयोगाला पत्र देखील दिले आहे (Shiv Sena Mashal symbol Controversy Samata Party).
सुप्रीम कोर्टानं ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला होता. पुढील आदेश येईपर्यंत ठाकरे गटाला मशाल चिन्ह वापरता येईल असा निर्णय कोर्टाने दिला होता. निवडणूक आयोगाविरोधातल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला. ठाकरे गटाने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक मशाल चिन्हावरच लढवली होती.
मात्र, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. समता पक्षाच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये "मशाल" हे निवडणुक चिन्हं कोणत्याही पक्षाला न देण्याची विनंती केली आहे. समता पक्षाने याबाबत केंद्र निवडणूक अयोगालाही यापूर्वी असे पत्र लिहिले आहे. याप्रकरणी समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. आमच्या या मागणीनंतरही निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे कायम ठेवले तर, न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार असल्याची भूमिका समता पक्षाने घेतली आहे. यामुळे शिंदे गटास समता पक्षाशी कोर्टात लढण्याची तयारी ठाकरे गटाला करावी लागू शकते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना फुटली. शिवसेनेचे दोन गट झाले. यानंतर महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध शिंदे असा सत्ता संघर्ष सुरु झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून गेले आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळाले आहे. त्यातच आता मशाल चिन्ह देखील उद्धव ठाकरेंच्या हातून जाणार तर नाही असा अशी चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून शिवसेना पक्ष गेला आहे. यामुळे नवीन पक्ष उभारण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर उभ राहिलं आहे. पक्ष आणि चिन्ह चोरले आहे. यामुळे शिवसेना कुणी संपवू शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नव्याने शिवसेना उभी करण्यासाठी कंबर कसली आहे.