close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लातूर थोरातांच्या नेतृत्वात पक्ष उभारी घेईल - अमित देशमुख

'बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ असून त्यांनी पक्षातील अनेक चढ उतार पाहिले आहेत'.

Updated: Jul 17, 2019, 04:46 PM IST
लातूर थोरातांच्या नेतृत्वात पक्ष उभारी घेईल - अमित देशमुख

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे ओळखले जात होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्री मंडळात कृषी, महसूलमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांनी कामही केले होते. आता त्यांच्या निवडीनंतर विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ असून त्यांनी पक्षातील अनेक चढ उतार पाहिले आहेत. त्यांना दांडगा अनुभव असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष चांगली उभारी घेईल अशी अपेक्षाही आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केली. ते लातूरमध्ये झी २४ तासशी बोलत होते. 

गुजरातच्या धर्तीवर काँग्रेस पक्षाने चार कार्याध्यक्षांची केलेली निवड स्वागतार्ह आहे. गुजरातमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे पक्ष नेतृत्वाने ही निवड केली आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या नेतृत्वाची सांगड घालून केलेल्या या निवडीमुळे काँग्रेस पक्ष मजबूत होईल असा आशावादही लातूर शहरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.