केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 

Updated: Feb 7, 2021, 08:29 AM IST
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन title=

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. सिंधूदुर्ग इथे अमित शाह सुमारे 3 तास असतील. खासदार नारायण राणे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयचं ते उद्घाटन करणार आहेत. सिंधुदुर्गात अमित शाह यांची उपस्थिती भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. एक तर अमित शाह यांच्या उपस्थितीमुळे नारायण राणे यांचे पक्षातील वजन वाढणार आहे. पण त्यापेक्षा सिंधुदुर्गात भाजपला बळकटी देत शिवसेनेला शह देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न असणार आहे. या दौऱ्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्याच्या घडामोडींबद्दल काय वक्तव्य करतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असेल.

याआधी बोलताना नारायण राणे यांनी अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत बोलताना म्हटलं होतं की, अमित शाह यांच्या पायगुणाने राज्यातील सरकार जावं. सिंधुदुर्ग कुडाळ येथे आज लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन होणार आहे. त्याआधी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत हे वक्तव्य केलं होतं.

भाजप शिवसेनेसोबत पुन्हा जाणार नाही. शिवसेनेसोबत कुणी जाऊ इच्छित नाही, असं ही नारायण राणेंनी म्हटलं आहे. तर मुंबईचा महापौर भाजपचा असेल असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.