सातारा : सातारा जिल्ह्यातलं तापमान ४४ अंशांवर गेल्यानं हैराण झालेल्या सातारकरांना अवचित दिलासा मिळाला तो अवकाळी पावसाचा. जिल्ह्यातल्या वाई तसंच कराड, मलकापूर, तारळे, उंब्रज, मसूरसह दुष्काळी कोरेगाव भागात गारांसह जोरदार अवकाळी पाऊस बरसला.
अचानक आलेल्या या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. विजा आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतीच्या मशागतीला याचा फायदा होणार आहे.
सातारा सांगली कोल्हापुरात गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेनं आधीच वर्तवला होता.