महाराष्ट्रातील धडकी भरवणारा फ्लायओव्हर! 30 मजली इमारती इतका उंच, खाली पाहिले तर चक्कर येईल

Valley Pool : महाराष्ट्रात सर्वात उंच व्हॅली पूल बनला आहे. हा पूल 30 मजली इमारती इतका उंच आहे. या पुलावरुन खाली पाहिले तर चक्कर येईल. 

वनिता कांबळे | Updated: Nov 28, 2024, 07:34 PM IST
महाराष्ट्रातील धडकी भरवणारा फ्लायओव्हर! 30 मजली इमारती इतका उंच, खाली पाहिले तर चक्कर येईल  title=

Valley Pool On Samruddhi Mahamarg : महाराष्ट्रातील सर्वात उंच फ्लायओव्हर मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गवर बनला आहे. या पुलाची उंची धडकी भरवणारी आहे. समृद्धी महामार्गवर बांधण्यात आलेला हा व्हॅली पूल  30 मजली इमारती इतका उंच आहे. या पुलावरुन खाली पाहिले तर चक्कर येईल. जाणून घेऊया या पुलाविषयी.  

हे देखील वाचा... ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात

समृद्धी महामार्गामुळे 701 किमीचं अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग 390 गावांमधून जाणार आहे.  नागपूर ते शिर्डी या 520 किमी आणि  शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंजपर्यंत एकूण 80 किमी लांब अशा दोन टप्प्यात समृद्धी महामार्गा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा देखील लवकरच सुरु होणारे. यानंतर संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. थेट नदी आणि डोंगरांच्या वरुन हा फ्लायओव्हर बांधण्यात आला. म्हणूनच याला खऱ्या अर्थाने व्हॅली पूल असे म्हंटले जात आहे. या व्हॅली पुलावरुन खाली दरीत पाहिले चक्कर येईल इतका उंच हा पूल आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महामार्गावरुन ट्रेनपेक्षा सुपरफास्ट प्रवास! 701 KM अंतर फक्त 6 तासात पार होणार

हा पूल बांधणे म्हणजे इंजिनीयर्ससाठी मोठे चॅलेस होते.  ज्या भागात हा पूल बांधण्यात आला आहे तिथे खोल दऱ्या, डोंगर, नदी आहे.  या टप्प्यात डोंगर दऱ्यांमुळे तसेच अति पर्जन्यमान असल्यामुळे पुलांचे बांधकाम आव्हानात्मक होते. या टप्प्यात एकूण 15 व्हायाडक्ट (व्हॅली पूल) आहेत. या पुलांची एकूण लांबी 11  कि. मी. आहे. त्यापैकी पॅकेज 16 मध्ये सर्वाधिक लांबीचा व्हॅली पूल (व्हायाडक्ट) उभारण्यात आला आहे.  2.28 कि. मी. लांबीचा हा पूल आहे. पॅकेज 15 मध्ये खोल दरी असल्यामुळे (व्हायाडक्ट-२) पुलाच्या खांबाची उंची 84 मीटरपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या पुसाची उंची  28 ते 30 मजली इमारतीएवढी आहे. यासह शेवटच्या टप्यात 6 छोटे पूल देखील बांधण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा देखील येथे बांधण्यात आला आहे. या बोगद्यामुळे अवघ्या  इगतपुरी ते कसारा हे अंतर आठ मिनिटात पार करता येणार आहे.