इंजिनात बिघाड, विदर्भ एक्स्प्रेस खोळंबली; प्रवासी संतापले

...

Updated: Jun 18, 2018, 09:00 AM IST

मुंबई:  नागपूरकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. नवे इंजिन तयार आहे. मात्र, ते आणण्यासाठी ट्रॅक मोकळा करून दिला जात नसल्याने गेले २ तास गाडी जागेवरच उभी आहे. बडनेरा स्थानकापासून काही अंतरावर गाडी उभी आहे. दरम्यान, प्रवासाचा खोळंबा झाल्याने प्रवासी संतापले असून, ते आंदोलनाच्या तयारीत आहेत. नवे इंजिन आणून गाडी रवाना करता येऊ शकते. मात्र, रेल्वे प्रशासन अक्षम्य निष्काळजीपणा दाखवताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे अन्य सर्व गाड्याना हिरवा कंदील दिला जात आहे.