VIRAL VIDEO : लाथा बुक्क्यांनी एकमेकींना तुडव तुडव तुडवलं; भर रस्त्यात मुलींची तुफान हाणामारी

नाशिकमध्ये (Nashik) महाविद्यालयीन तरुणी  भिडल्या आहेत.  झिंज्या धरून या मुलींनी फ्री-स्टाईल हाणामारी ( college girls fighting) केली आहे. या घटनेचा VIDEO Viral झाला आहे. 

Updated: Feb 4, 2023, 06:31 PM IST
VIRAL VIDEO : लाथा बुक्क्यांनी एकमेकींना तुडव तुडव तुडवलं; भर रस्त्यात मुलींची तुफान हाणामारी

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : मुलांची हाणामारीचे प्रकार आपण नेहमीच पाहत असतो. नाशिकमध्ये (Nashik) मात्र, दोन मुली एकमेकींना भिडल्या आहेत. या मुलींनी लाथा बुक्क्यांनी एकमेकींना तुडव तुडव तुडवलं आहे.  भर रस्त्यात मुलींची तुफान हाणामारी ( college girls fighting) झाली. या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (VIRAL VIDEO) झाला आहे. 

नाशिकमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये झालेली ही फ्री स्टाईल हाणामारी चांगलीच चर्चेत आली आहे. नाशिकरोड परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजसमोरचा मुलींमध्ये हा राडा झाला. या दोन मुलींमध्ये चांगलीच जुंपली. यांची ही मारामारी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  

भररस्त्यात या दोन विद्यार्थीनी एकमेकींना भिडल्या. लाथा बुक्क्यांचा वापर करत मुलींनी हाणामारी केल्याचा व्हिडिओत दिसत आहे.  ही फ्री स्टाईल हाणामारी होत असताना आजूबाजूला बघ्यांची गर्दी झाल्याचे व्हिडिओत पहायला मिळत आहेत. दरम्यान ही फ्री स्टाईल हाणामारी का झाली, याचं कारण समजू शकलेलं नाही.  या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॉलेजच्या तरुणांमध्ये राडा झाल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, मुलींमध्ये झालेली ही हाणामारी सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. या मुलींची मारामारी सुरु असताना सर्व जण पाहत होते. याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. मात्र, कुणीही या मुलींचे भांडण सोडवण्यासाठी पुढे आली नाही. कुणीही या मुलींचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. या मुलींमध्ये नेमकं अस काय भांडण झालं ही या मुली थेट भर रस्त्यात हाणामारीवर उतरल्या.