Ajit Pawar : वस्तादने एक डाव राखून ठेवलाय..तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका...असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोलीत अत्रामांच्या मुलीला इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट देण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्येला शरद पवार गटातर्फे तिकीट देण्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत गर्भित इशारा दिला.
सध्या राजकीय परिस्थिती वेगळी झाली आहे. विरोधकांकडून घरं फोडण्याचे काम सुरू आहे. आत्राम यांनी मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापा विरोधात लोकसभा निवडणुकीत उभी राहण्याची भाषा करत आहे. आम्ही चूक केली. त्याबद्दल जाहीरपणे बोललोही. तुम्ही करू नका, बापासोबत रहा. बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे भावनिक आवाहन त्यांनी केले. वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला.
महायुतीतील वाद वाढण्याची शक्यता आहे...जळगावमधील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरलीये...अर्थ खातं सर्वात नालायक खातं असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत...पाणी पुरवठी खात्याची फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे तब्बल दहा वेळा पाठवली आणि परत आली...मात्र, पाठपुरावा सोडला नाही...त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात येणा-या काळात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय...तर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य अर्थ खात्याच्या प्रशासकीय कामाबाबत होतं की अजित पवारांबाबत होतं याबाबत खुलासा होणं गरजेचं असल्याचं अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी सांगितलंय...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागावाटपाबाबत रोखठोक भूमिका मांडलीये.. आम्ही विधानसभेच्या 60 जागांवर लढण्याची तयारी केलीये... पण त्यापेक्षा अधिक जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे असं अजित पावारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय... आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत आलो आहोत. यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली जाणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.. मुख्यमंत्री महायुतीचाच होईल असा दावा यावेळी त्यांनी केला.. सध्या तिनही घटक पक्ष महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत चर्चा होईल असं ते म्हणाले..