मुंबई : ओखी वादळामुळे आलेल्या अनियमीत पावसाचा जोर ओसरला असला तरी हा पाऊस अवेळी आला असल्याने हवामानातील या मोठ्या प्रमाणात झालेला बदल आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे निरीक्षण डॉक्टरांतर्फे नोंदविण्यात येत आहे.
हिवाळ्यात बसरणाऱ्या पावसामुळे दोन भिन्न प्रकारचे वातावरण एकत्र आले असून साथीचे आजार फोफावण्याची शक्यताही डॉक्टरांनी वर्तविली आहे.
त्यामुळे वादळाचे हे परिणाम रोगाराईच्या रूपात दूरगामी राहणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
यामध्ये डेंग्यू, मलेरिया यांसह गॅस्ट्रो, कावीळ ,स्वशनाचे ,दमा ,कॉलरा ,टायफाईड यांसारखे विकार बळावण्याची चिन्हेही दिसत आहे.. त्यामुळे सद्यपरिस्थितीत सर्वांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात येतोय.