विष्णू बुरगे, बीड : कोरोना आणि लॉकडाऊन याच्यामुळे अनेकांचा रोजगार गेले, याचा त्रास अनेकांना सहन करावा लागला. मात्र मंदीतही अनेकांनी संधी शोधली बीड जिल्ह्यातील एका तरुणाचा सलून व्यवसाय बंद पडला आणि त्यामुळे खचून न जाता त्यानं मालवाहतूक रिक्षालाच सलूनचे दुकान बनवलं आणि जिल्ह्यात पहिल्यांदाच फिरतं सलून सुरू केलं. ज्यामुळे त्याचं हे सलून चर्चेचं विषय ठरलं.
खरंतर बीड जिल्ह्यातील विश्वनाथ वाघमारे या तरुणाचा सलून व्यवसाय लॉकडाऊनमध्ये बंद पडला. त्यामुळे त्याच्याकडे दुकानाचं भाडं द्यायलाही पैसे नव्हते. अखेर त्याला त्यांचं दुकान बंद करावं लागलं. परंतु त्याने हिंमत सोडली नाही. त्याच्या काही तरी वेगळं करण्याच्या भावनेतुन त्यानं एक वेगळी कल्पना शोधून काढली, ज्यामुळे विश्वनाथने चालतं सलून उभारलं.
मंदीत ही या तरुणांना संधी शोधली, एका कॉलवर लग्न समारंभाच्या ठिकाणी आणि कार्यक्रमाच्या स्थळी तसेच गावागावांमध्ये जाऊन फिरता सलूनच्या माध्यमातून त्यानं अनोखा प्रयोग सुरू केलाय तो यशस्वी देखील ठरला.
खरंतर अनलॉक झाल्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि दुकानाचं भाडं आणि डिपॉझिट देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, मग व्यवसाय कसा सुरु करायचा असा प्रश्न उपस्थीत झाला. शेवटी यातून देखील विश्वनाथने डोकं लावलं आणि भाड्याचा मालवाहतूक टेम्पो भाड्याने घेतला.
तेव्हा त्याने सलूनला लागणारे सर्व साहित्य आणि सलूनची सर्व अरेंजमेंट या मालवाहतूक टेम्पोमध्ये करून घेतली आणि हे अनोख फिरते सलून सुरू केले. आज त्याला या व्यवसायातून चांगले पैसे मिळतात असं त्याचं म्हणणं आहे.
काशिनाथ वाघमारे हे त्याचे वडील आहेत, आता विश्वनाथ सोबत त्याचे वडिलही त्याला या कामात मदत करू लागले. त्यांच्या मुलाने केलेल्या या गोष्टीचे काशिनाथ यांना अभिमान वाटतो. एक वेळ अशी आली होती की, कुठला व्यवसाय करावा आणि पुन्हा व्यवसाय कसा सुरु करावा याची चिंता त्यांना होती, मात्र मुलांनी केलेल्या या युतीमुळे आता सलूनचा व्यवसाय सुरू झाला आणि चांगले ग्राहक मिळतात फिरत्या सलून च्या माध्यमातून आमची उपजीविका चांगली चालत असल्याचं काशीनाथ वाघमारे सांगतात
मंदित संधी शोधता येथे फक्त कल्पक हवी हे बीड जिल्ह्यातील विश्वनाथ वाघमारे या तरुणाला करून दाखवलं अनेकांचे व्यवसाय गेलेले असताना स्वतःचा नव्या कल्पनाशक्तीने व्यवसाय सुरू करून आज त्यांना आपल्या उपजीविकेचे साधन बनवले आहे. ज्यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणादायी देखील बनले आहे.