प्रफुल्ला पवार, झी मीडिया, श्रीवर्धन: महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य परिसर आहेत. आपल्या कोकणातही (Kokan) अशी अनेक ठिकाणं आहेत जेथे आपण आवर्जून जातो आणि आपला निवांत वेळ घालवतो. आजकाल अनेकांना कामामुळे वेळ मिळत नाही आणि त्यामुळे या भागात जाणंही शक्य होतं नाही. परंतु आपण कायमच असा विचार करतो की कोकणात वर्षातून एकदा गेलोच पाहिजे. समुद्र, पाणी, बीच, (Beach) किनारा, रेसॉर्ट, निसर्ग या सगळ्याचा आस्वाद तुम्ही येथे घेता. (viral video dolphin in raigad harihareshwar sightseeing for tourist)
निवांतपणा म्हणजे कोकण असं समीकरणचं बनलं आहे. तेव्हा निसर्ग सानिध्यात डॉल्फिनचंही दर्शन होते. यंदाच्या मौसमातही तुम्हाला डॉल्फिनचं दर्शन पाहायला मिळणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात पर्यटकांना डॉल्फिन चे दर्शन झालंय.
हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक
डॉल्फिनचे (Dolphin) थवे इथं मुक्त संचार करताना आढळत आहेत. घोळक्याने पोहणारे आणि अधून मधून पाण्याबाहेर उड्या मारणारे डॉल्फिन पर्यटकांना आनंद देवून जात आहेत.
श्रीवर्धनमध्ये हरिहरेश्वर (Harihareshwar) येथील डॉल्फिनचं कायमच दर्शन घडतं आलं आहे. हिवाळ्याच्या या ठिकाणी तुम्हीही या डॉल्फिन्सची सफर अनुभवू शकता. सध्या हिवाळ्यात कुठे जायचा असा प्रश्न सतावत असेल तर नक्कीच या टूरचा विचार करू शकता. हरिहरेश्वर ही एक चांगली टूर आहे आणि त्यातून येथे तुम्हाला निवांत वेळ आणि निसर्गरम्य परिसराची ट्रिट मिळेल.