VIDEO : ट्रक चालकांकडून पोलिसांची 'वसुली' कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून तो 'झी २४ तास'च्या हाती लागलाय

Updated: Dec 5, 2018, 04:23 PM IST
VIDEO : ट्रक चालकांकडून पोलिसांची 'वसुली' कॅमेऱ्यात कैद title=

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील टेंभूर्णीत पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांची ट्रक चालकांकडून वसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. पुणे-सोलापूर महामार्गावर टेंभूर्णी बाह्यवळण रस्त्यावर काल दुपारी टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस सागर घोडके, गणेश खोटे आणि सचिन ननवरे यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्रक चालकांना कारवाईसाठी थांबवले होते. मात्र, यावेळी पोलीस चालकांकडून नियम भंग केल्याच्या नावाखाली एन्ट्री वसूल करत असल्याचं व्हिडिओ चित्रण एका चालकानं केलं.

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून तो झी २४ तासच्या हाती लागलाय. हा प्रकार समोर आल्यानंतर तीन वाहतूक पोलिसांच्या चौकशीचे आदेश सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.