close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आषाढी वारीनंतर १८ दिवसांनी विठूरायाला मिळणार निद्रा

आषाढी वारीनंतर विठूरायाची प्रक्षाळ पूजा

Updated: Jul 21, 2019, 09:25 PM IST
आषाढी वारीनंतर १८ दिवसांनी विठूरायाला मिळणार निद्रा

पंढरपूर : आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना गेले १८ दिवस २४ तास दर्शन देऊन थकलेल्या विठूरायाची प्रक्षाळ पूजा करून राजोपाचारास सुरुवात झाली. हजारो मैलाचे अंतर पायी चालून आलेल्या भाविकांना २४ तास दर्शन घेता यावे यासाठी विठूराया गेले १८ दिवस न विश्रांती घेता मंदिरात उभा होता. 

दुध दहीसह सुगंधी केशर पाण्याने श्रीविठ्ठलाला वेद मंत्रांसह अभिषेक करण्यात आला. १८ दिवसांनंतर देवाला झोप मिळणार असल्याने देवाचा काढून ठेवलेला पलंग आणि बिछाना स्वच्छ करण्यात आला. या बिछान्यावर विविध सुगंधी पारंपारिक अत्तरे लावण्यात आली.

शेकडो वर्षांपासून या प्रक्षाळ पुजेची परंपरा पंढरपूरच्या घराघरात सुरू असते. देवाला पुरणपोळीसह पंचपक्वानांचा महानेवैद्य दाखविण्यात येतो.