सुट्टीसाठी कोकण, गोव्याला जायचा प्लान? तर हे जाणून घ्याच...

 प्रतीक्षा यादी लांबतच चाललीय...

Updated: Apr 11, 2018, 11:34 PM IST
सुट्टीसाठी कोकण, गोव्याला जायचा प्लान? तर हे जाणून घ्याच... title=

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर आता गावी जाण्यासाठी गर्दी वाढते आहे. एप्रिल अखेरीस सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे तर कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या सगळ्या एक्सप्रेस फुल्ल झाल्या आहेत. पहाटेची वेळेत सुटणाऱ्या गाड्या तसेच अधिक तिकीट दर असलेल्या डबलडेकर, तेजस एक्स्प्रेसमधील या काळातील प्रतीक्षा यादीही वाढली आहे. शनिवार, २८ एप्रिल ते १ मे या कालावधीतील तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, एलटीटी-मडगाव डबलडेकर एसी, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस आदी गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

पहाटेची वेळेत सुटणाऱ्या गाड्या तसेच अधिक तिकीट दर असलेल्या डबलडेकर, तेजस एक्स्प्रेस यांचीही या दिवसांतली प्रतीक्षा यादी वाढतच चाललेली दिसतेय. तेजस एक्स्प्रेसमध्ये २५ एप्रिलपासूनची आरक्षण यादी १००च्या पुढे गेलीय. या गाडीचा कणकवली स्थानकातला थांबा रद्द करण्यात आलाय. त्यामुळे ही गाडी केवळ चिपळूण स्टेशनवरच थांबेल... असं असलं तरी या गाडीचं आरक्षण मात्र केव्हाच फुल्लं झालंय.  
 
जनशताब्दी एक्सप्रेसलाही एक वाढीव डबा जोडून त्याचं तिकीट तब्बल १८७० रुपये निर्धारीत करण्यात आलंय. तरीदेखील या डब्यासाठीही प्रतीक्षा यादी लांबतच चाललीय.