एका कॉलमुळे निर्दयी आई-वडिलांचा खरा चेहरा समोर

2 चिमुकल्यांनी मोठ्या हिमतीनं आपल्या जन्मदात्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला...

Updated: Jul 3, 2021, 05:40 PM IST
एका कॉलमुळे निर्दयी आई-वडिलांचा खरा चेहरा समोर title=

वर्धा: काही दिवसांपूर्वी एक महिलेनं आपला राग तान्ह्या मुलावर काढल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा जन्मदात्या बापाने आणि सावत्र आईनं मिळून चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आई-वडिलांचा खरा चेहरा एका फोनमुळे समोर आला आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसला. 

पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यात ही घटना घडली. चिमुकल्यांचा अमानुष छळ करणाऱ्या आई-वडीलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. सावत्र आईकडून लहान मुलांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. इतकच नाही तर उपाशी पोटी त्याला जंगलात सोडण्याचा निर्दयीपणाही सावत्र आईनं केला होता. 

दोन दिवसांपूर्वी चाईल्ड लाईनच्या 1098 हेल्पलाईनवर 2 लहान बहिण भावांचा वडील आणि सावत्र आईकडून छळ होत असल्याची तक्रार केली. त्यावरून चाईल्ड लाईनच्या चमून आर्वी तालुक्यातील गाव गाठल. चिमुकल्यांची वडील आणि आईच्या ताब्यातून सोडवणूक करत पोलिसांत तक्रार केली.

सुरवातीला या प्रकरणात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मुलांना केलेली मारहाण पाहता कलमात वाढ करत कलम 307 सुद्धा लावण्यात आली. मुलाचं वय 8 तर मुलीचं वय 11 वर्ष असल्याची माहिती मिळाली आहे. चिमुकल्यांचा झालेला झळ मन सुन्न करणारा आहे. 

सध्या दोन्ही मुले हे वर्धेच्या बालगृहात आहे. यांचं येथे समुपदेशन करत त्यांच्यावर उपचार केले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत मुलांचे वडील आणि सावत्र आईला अटक केली. या प्रकरणामुळे सध्या वर्ध्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.