आधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्..., वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

Wardha Crime News: वर्ध्यात महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या वर्धा-नागपूर बायपास परिसरातील धक्कादायक घटना आहे.   

Updated: Jan 24, 2024, 06:44 PM IST
आधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्..., वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न title=
Wardha News Women tries to kill a 12 year old child out of superstition News in Marathi

Wardha Crime News: वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. महिलेकडून एका 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. वर्ध्यातील नालवाडी परिसरात शेजारी रागणाऱ्या महिलेने एका 12 वर्षीय बालकाचा विहिरीत ढकलून दिले होते. विहिरीला शेंदूर लावायला सांगत शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीतील दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव करत जीव वाचवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. 

नालवाडीच्या नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा राजू वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून विहिरीजवळ नेले. तिने मुलाला विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. मुलगाही तिने सांगितल्याप्रमाणे विहिरीला शेंदूर लावण्यासाठी वाकला त्याचवेळी तिने बालकाला लगेच विहिरीत ढकलले. मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या सहाय्याने कसाबसा चढत वर आला आणि आपले प्राण वाचवीले. घरी पोहचलेल्या बालकाने आई वडिलांना त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा राजू वरके हिच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून नरबळी अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वर्ध्याच्या नागसेन नगर येथे घडलेल्या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव  गजेंद्र सुरकार यांनी त्या विहिरीवर जाऊन पाहणी केली असून घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती घेतली आहे. 12 वर्षीय चिमुकल्याला विहिरीवर नेऊन शेंदुर लावून पूजा करण्यात आली असून त्याला जिवंत विहिरीत ढकलण्यात आले होते, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 2013 ते 2014 या सालातही नरबळीची घटना पुढे आली होती. तेव्हाही एका अल्पवयीन मुलाच्या शरीराचे तुकडे कापून खाण्यात आले होते, असं त्यांनी नमूद केलं. 

समाजात अंधश्रद्धा थांबावी म्हणून वेळोवेळी जनजागृती केलीय जाते. अंधश्रद्धेमुळं बळी जाऊ नये म्हणून कठोर कायदे देखील करण्यात आलेत. मात्र अंधश्रद्धेला खतपाणी कुठून घालण्यात येते असा सवाल आता उपस्थित होत आहे.