महाबळेश्वरच्या दिशेनं जाणाऱ्यांनो, पाहा Video; ही मोठी बातमी तुमच्यासाठी

वाट धोक्याची आहे.... 

Updated: Dec 2, 2021, 04:02 PM IST
महाबळेश्वरच्या दिशेनं जाणाऱ्यांनो, पाहा Video; ही मोठी बातमी तुमच्यासाठी
घटनास्थळाची दृश्यं

सातारा : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. पाऊस अवकाळी असला, तरीही त्याचा जोर हा मान्सूनइतकाच दिसून येत आहे. 

पावसामध्येच अनेक ठिकाणी सोसाट्याचा वाराही सुटत आहे. डिसेंबर महिन्यात आलेल्या या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

इतकंच नवे तर, वाहतुकीवरही याचे परिणाम होत आहेत. सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार वाई- पसरणी रस्त्यावर दरड कोसळली आहे. 

दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला ही दरड कोसळल्याचं कळत आहे. दरड कोसळल्याचं कळताच तातडीने यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि तिथे दरड हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं. 

राज्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे दरड कोसळण्याच्या काही घटनांची नोंद करण्यात आली. यामध्ये तुलनेने महाबळेश्वर मार्गावरील ही घटना गंभीर असल्याचं दिसून आलं. 

घटनेमध्ये अद्यापही कोणतीही हानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. 

दरम्यान, महाबळेश्वरच्या दिशेनं सुट्टीसाठी जाणाऱ्यांची संख्या वर्षअखेरीस वाढताना दिसते. 

आतासुद्धा या गिरीस्थानाच्या दिशेनं अनेक पर्यटकांची पावलं वळत आहेत. पण, दरडी कोसळण्याच्या या घटनांमुळं वाहतुकीवर याचा थेट परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे.