मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेचा विषय ठरतात. एखादी सभा असो किंवा मग कौटुंबीक कार्यक्रम. मुख्यमंत्र्यांची उपस्थिती सर्वांचच लक्ष वेधून जाते. सोबतच लक्ष वेधतात त्या म्हणजे सौ. फडणवीस, म्हणजेच अमृता फडणवीस.
मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याऱ्या अमृता फडणवीस या तितक्याच दिलखुलासपणे इतरही कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. अशाच एका कौटुंबीक कार्यक्रमात त्यांनी नुकतीच हजेरी लावली होती. जेथे त्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसल्या.
एका कौटुंबीक विवाहसोहळ्यात त्यांनी ठेकाही धरल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी स्वत:च सोशल मीडियावरुन या सोहळ्याचा व्हिडिओ पोस्ट करत सर्वांचच लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओमध्ये त्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातील, 'दीवानी मस्तानी' या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं.
अमृता फडणवीस या व्हिडिओमुळे नव्हे तर, इतरही बऱ्याच कारणांनी चर्चेत असतात. कधी, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत गायलेलं गाण, तर कधी कोणा एका समारंभात काढलेला सेल्फी, तिथे सौ. फडणवीस यांचं नाव आलं की चर्चा तर होणारच असं म्हणणं वावगं ठरणार नाही.