ACB Maharashtra Raid In Aurangabad : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Maharashtra ACB ) आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला (arrests government officer) तब्बल 8.5 लाखांची लाच घेतना (taking bribe) रंगे हात अटक करण्यात आला आहे. या कारवाईमुळे औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे (ACB Maharashtra Raid In Aurangabad).
ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात आठ लाख 53 हजार ची लाच घेताना देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. देशमुख हे वैजापूर जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांना सापळा रचून अटक केली आहे. जलसंधारण विभागातील हा अधिकारी बिलाची टक्केवारी घेताना रंगेहात पकडला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संभाजी नगरात लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई करत 2 जणांना अटक केली आहे.
उपविभागिय जलसंधारण अधिकारी ऋषीकेश देशमुख आणि लिपिक भाऊसाहेब दादाराव गोरे याना साडे आठ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलीय. तक्रारदार हे चौडेश्वरी कंट्रक्शन परभणी या कंपनीच्या नावावरती कोल्हापुरी बंधा-याचे दोन ठिकाणी परभणीत काम केले होते या दोन्ही कामाचे बिल 1 कोटी 19 लाख आणि 18 लाख असे झाले.
या दोन्ही कामाचे बिल काढण्यासाठी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांच्यासाठी 7.5 टक्के प्रमाणे 8 लाख 3 हजार 250 रुपये, आणि स्वतःसाठी आणि महामंडळ कार्यालयाचे मिळून 50 हजार रुपये असे एकूण 8 लाख 53 हजार 250 रुपये लाचेची मागणी केली होती. या नुसार महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरगाबाद कार्यालयासमोर सापळा रचला आणि लाचेची रक्कम घेताच त्यांना अटक करण्यात आली.