योगेश खरे झी मीडिाया नाशिक : देशात सोशल मिडीयाच्या व्हायरल मेसेजिंग मधून मॉब लीन्चींग आणि हत्यासत्र सूरु झालंय... मात्र नाशिकमध्ये याच सोशल मीडियाचा वापर विधायक कामासाठी करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातल्या कोटंबी गावातचा पाणी प्रश्न आता कायमचा सुटलाय... योगेश कासट आणि त्यांच्या मित्रांमुळे हे शक्य झालंय.
मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणारे योगेश मुळचे लासलगावचे.. दुष्काळाचे चटके त्यांनीही सोसलेत.. फेसबुकवर मित्रांनी सुरु केलेल्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून ते पाणीटंचाईच्या कहाण्या वाचत.. जिल्ह्यातील आदिवासींची पाण्यासाठीची धडपड पाहून त्यांनी पाणीप्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेतली.. मित्र राहुल मेहता आणि जे. जे. यादव यांच्या मदतीनं कोटंबी गावचा पाणीप्रश्न सोडवला.. यासाठी त्यांनी प्रत्येकी पाचशे डॉलर्स म्हणजे भारती चलनात बत्तीस हजार सहाशे रुपये प्रमाणे लाखभर रुपये फोरमच्या बँक खात्यात जमा केले.. आणि कोटंबीची तहान भागवली.
इतकच नाही तर या त्रिकुटानं अमेरिकेतील मित्रांकडून आणखी दोन लाख रुपये निधी जमा केलाय.. त्यासाठी त्यांनी एक फंड रेजर लिंक सुद्धा तयार केलीये. या पैशांतून ते सुरगाणा या दुर्गम तालुक्यातील आदिवासी बांधवांचा पाणी प्रश्न सोडवणार आहेत. विधायक कामासाठी सोशल मीडिया किती प्रभावी साधन आहे याचं हे मूर्तीमंत उदाहरण म्हणावं लागेल.