महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हरफ्लो

गणेश चतुर्थीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर गणरायाची कृपादृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोसळत आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 28, 2017, 01:01 PM IST
महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हरफ्लो  title=

मुंबई : गणेश चतुर्थीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर गणरायाची कृपादृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोसळत आहे.

तसेच असाच मुसळधार पाऊस गणेश विसर्जन म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत होणार असल्याचं पुणे वेधशाळेने वर्तवलं आहे. आणि आपणं पाहतोच आहे की पुणे वेध शाळेचा अंदाज खरा ठरतं असल्यामुळे मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेला आता मस्त पाऊस एन्जॉय करता येणार आहे. 

आतापर्यंत महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा आपण पाहिला तर तो समाधानकारक आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, भोजापुर, जायकवाडी यासारखी धरणे आता ओव्हरफ्लो होवून वाहत आहेत. जाणून घेऊया प्रत्येकाची सरासरी....

साठा(दलघफू/टीएमसी/टक्केवारी)

 
१)भंडारदरा - ११०३९  १००%    ओव्हरफ्लो                               
२)निळवंडे - ७९०९ ९५.०६%   ओव्हरफ्लो                         
३)मुळा -२१०७३   ८१.०५%                                  
४)आढळा - १०६०   १००%    ओव्हरफ्लो                                 
५)भोजापुर - ६१/४८५   १००% ओव्हरफ्लो
६)जायकवाडी*
एकूण - ७६.९६५ टीएमसी/ ७४.९२%
उपयुक्त -५०.८९८ टीएमसी ६६.३८%
या धरणांचे कालवे बंद करण्यात आले आहेत. 

पर्ज्यन्यवृष्टी*प्रतिदिन/एकुण  (मिमि) 

 १)घाटघर - ४३/४०३४
 २) रतनवाडी - ३७/४५६५
 ३)पांजरे - ३५/३५३२
 ४)भंडारदरा - २७/२६८६
 ५)निळवंडे - ००/६३६
 ६)आढळाल- ००/३०१
७)अकोले- ०३/७१०
 ८)कोतुळ - ०१/५८५
 ९)संगमनेर - ०४/२८४
१०)ओझर - १५/५०९
११)श्रीरामपुर - ००/४२५
१२)अहमदनगर - ४७/४३९
१३)मुळा डॅम - १४/३७८
१४)भोजापुर - ००/४४८
१५)जायकवाडी - १८/४५०

(विसर्ग)क्युसेक्स

१)भंडारदरा -१६२४
२) निळवंडे - २९५५
३)आढळा(नदी) - ६९
४)कोतुळ(मुळा नदी) - २६३५
५)मुळा डॅम(कालवे)-बंद ०००
६)भोजापुर(नदी)-०००
कालवा सुरुआहे.-१५०
७)नां.मधमेश्वर(गोदावरी) - १०३४५
८)जायकवाडी-कालवे-बंद

(नवीन आवक-प्रतिदिन/एकूण) दलघफू*/टीएमसी

१)भंडारदरा - ११५/१६५४१
२)निळवंडे - २२४/१४२९४      
३)मुळा - ३०३/१९९९०
४)आढळा - ०७/१२२४
५)भोजापुर - ५/४९०(अंदाजे)
६)जायकवाडी-१.०४३ टी.एम.सी.
 संगमनेरचे जलसंपदा इंजिनिअर हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेली माहिती.