चार महिन्यांत सरकार बदलायचंय; शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.  शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 12, 2024, 06:09 PM IST
चार महिन्यांत सरकार बदलायचंय; शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ   title=

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केला आहे. अशातच शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. 

4 ते 6 महिन्यांत सरकार बदलायचंय आणि निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचाय...असं आश्वासन शरद पवारांनी निरवांगी येथील ग्रामस्थांना दिले. त्याचबरोबर दुधाला अनुदान न मिळाल्यास रस्त्यावर उतरायला तयार राहा मी स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले. शरद पवारांनी दुष्काळी पाहणी दौरा सुरू केला आहे. निरवांगी येथे दुष्काळी पाहणी दौ-यावर आले असता त्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतले त्यावेळी ते बोलत होते.

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी इंदापूर तालुक्यातील नीरा खो-यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केलीय. शरद पवारांनी यावेळी निरवांगी येथे शेतक-यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या असून दूध दर च्या प्रश्नावरही शरद पवारांनी भाष्य केले. दूध उत्पादकांना पाच रुपयांचं अनुदान 100 टक्के मिळालचं पाहिजे सरकारला सांगून बघू जर सरकारने नाही ऐकलं तर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा असा सूचक इशाराही राज्य सरकारला शरद पवारांनी दिला. 

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी करताच यावर सहा महिने थांबा मला सरकार बदलायचे आहे असं मोठ विधान करीत सत्ता ज्यांचे हाती आहे त्यांना विनंती करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगू शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल त्याची तयारी ठेवा असं आवाहन पवार यांनी केले.